Get In Touch

Wrasse climbing gourami amur pike Arctic char, steelhead sprat sea lamprey grunion. Walleye

Contacts
Location
523 Sylvan Ave, 5th Floor
Mountain View, CA 94041USA

Case Study Details

Hello-pune-Warje-news

ऑक्सिजन मास्क असणारे नागरी वन उद्यान ‘रोल मॉडेल’

आणखी चार ठिकाणी काम सुरु, वनविभाग, स्वयंसेवी संस्थांतर्फे उपक्रम

शहरात जैवविविधता वाढीसाठी नागरी वन उपक्रम उपयोगी ठरत असल्याने पुण्यातील ‘वारजे नागरी वन उद्यान’ देशासाठी रोल मॉडेल ठरले आहे.  त्यामुळे त्याची अंमलबजावणी देशभर होणार असून, पुण्यातही चार ठिकाणी अशी ऑक्सिजन मास्क ठरणारी नागरी वन उद्याने वन विभागातर्फे स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन साकारली जात आहेत. सध्या चार ठिकाणी नागरी उद्यानांचे काम सुरू आहे.

शहरी भागात प्रदूषित हवा स्वच्छ करण्यासाठी झाडे महत्वाची कार्ये करत आहेत. जमिनीची धूप कमी करणे, धुरापासून तयार होणारे धुके कमी करणे, जमिनीचा कस तयार करणे ही मदत नागरी वनीकरणाने होत आहे. या सर्वांचा अभ्यास करून नागरी वनीकरणाची संकल्पना राबविली आहे.

नागरिकांनीही स्मृती वन धर्तीवर आपल्या प्रियजनांच्या स्मृती जपण्यासाठी झाड लावून ते जपले आहे. यासाठी वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, तेर पॉलिसी सेंटरच्या विनिता आपटे यांच्या मार्गदर्शाखाली हे काम झाले आहे.

वारजे येथील वन उद्यान देशासाठी आदर्श प्रकल्प ठरला आहे. शहरात वन विभागाकडून इतर ठिकाणी राबविला जात आहे. त्यावर काम सुरु आहे. स्थानिक नागरिकांचे आणि स्वयंसेवी संस्थांचे यासाठी सहकार्य लाभत आहे.

– ए. श्रीलक्ष्मी, उपवनसंरक्षक, पुणे

प्रत्येक शहरात वन उद्याने गरजेचे

वन उद्यानातील झाडांमुळे येथे ऑक्सिजनची पातळी खूप असल्याने दररोज सुमारे हजार-दीड हजार लोक फिरायला येत आहेत. कारण शहरात वाहनांमधून निघणारे धूलिकण नागरिकांच्या शरीरात जात असून, शुद्ध ऑक्सिजन मिळणे अवघड झाले आहे. शुद्ध हवेसाठी अशी वन उद्याने आता प्रत्येक शहरात आवश्यक आहेत. म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे देशभरात वारजे नागरी वन उद्यानाचे मोडेल राबविण्यात येणार आहे.

देशी ६५00 झाडे बहरताहेत

वन उद्यानात वड (१ हजार), पिंपळ (९९००), चिंच (४५0), आवळा (२0०), लिंबू (७00), आपटा (१५0), कांचन (२००), बांबू (८५0), शिरस (२५०), करंज (300), गुलमोहर (९५0), भोकर(२००) अर्शी एकूण ६५00 देशी झाडे लावली आहेत.

Leave a Comment