इतिहास, तेव्हाच्या आठवणी आणि प्रकट अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित किस्से, अशी एका कॅमेर्यामागे छायाचित्रापेक्षाही प्रत्यक्षात यांच्यापासून ते हृतिक रोशनपर्यंत आणि एम. एफ. हुसेन, जे. आर. डी. टाटा, लतादीदी, सचिन तेंडुलकर असा छायाचित्रांशी संबंधित आठवणींचा ठेवी ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनीं बुधवारी उलगडला… तो ही खुद्द आशा भोसले यांच्या उपस्थितीत! निमित्त होते आशय सांस्कृतिकतर्फे त्यांच्याशी आयोजित करण्यात आलेल्या टुक- श्राव्य गप्पांचे.
गौतम राजाध्यक्ष यांनी आजवर काढलेल्या छायाचित्रांमधील त्यांची आवडती काही मोजकी छायाचित्रे “स्लाइड शो’च्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केली अन् त्याचबरोबर त्या छायाचित्रांमागचा इतिहास तेव्हाच्या आठवणी आणि किस्से अशी एका क्यामेरामागे असणाऱ्या कलाकाराची गप्पांची मैफल रंगत गेली. त्यामुळे छायाचित्रांच्या या ‘फ्लॅशबॅक’ प्रवासातून ‘प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर’ या उक्तीचा योग्य अर्थच बालगंधर्व मधील उपस्थितांना घेता आला.
कॅमेर्याला घाबरून असणारे दिलीपकुमार, अमिताभ यांच्यासारखे ‘सुपरस्टार’, अगदी नैसर्गिक भाव प्रगट करणारी नूतन, छायाचित्रांपेक्षाही अधिक सुंदर असणारी डिंपल, अवघ्या एका सुचनेरूप आपल्या चेहऱ्यात बदल करू शकणारी माधुरी… अशा ग्याम्लर क्षेत्राशी संबधित राजाध्यक्ष यांना कित्येकांच्या पडद्यामागच्या आठवणी गौतम राजाध्यक्ष यांनी कथन केल्या.
पहिल्या पासून मला चेहर्याचे आकर्षण आहे. एखाद्या व्यक्तीशी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी अथवा त्याच्यातील कलाशी आपला परिचय होतो, तो चेहर्याच्याच माधमातूनच म्हणूनच त्या चेहर्यातून परावर्तीत होणारे भाव जसेच्या तसे कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात मला आनंद मिळतो, असे विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यावर व्यावसायिक छायाचित्रकारा पर्यंत मजल मारणाऱ्या राजाध्यक्ष यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र काढताना केवळ तोच चेहरा आपल्याला दिसतो असे सांगून कॅमेराची भीती घालविण्याकरिता संबंधित व्यक्ती विषय त्याच्या आवडी-निवढी विषयी साधून त्याला रिल्याक्स केल्यावर अचूक छायाचित्र मिळते असेही राजाध्यक्ष यांनी सांगितले.