ग्रामपंचायती अंतर्गत गोठे, अहिस्वाडी येथे सामाजिक संस्थांतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक सेवासंस्था ‘तेर’, एम टीव्ही, १०० पायपर यांच्यातर्फे २०० लिटरच्या पंचवौस पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले. या संस्थांकडून आहिर्वाडी येथे खोदण्यात आलेल्या विहिरीच्या कामाचा आहावा घेण्यात आला. तेर पॉलिसी सेंटरच्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे, प्रकल्पप्रयुख राजकुमारी सूर्यवंशी, वेचे उपसरपंच लहू बाढुंज, गोमुख संस्थेचे जालिंदर ढमाले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भुळाजी कोकरे, मधुकर मोढवे, संतोष गोरे आदी उपस्थित होते.