Get In Touch

Wrasse climbing gourami amur pike Arctic char, steelhead sprat sea lamprey grunion. Walleye

Contacts
Location
523 Sylvan Ave, 5th Floor
Mountain View, CA 94041USA

Case Study Details

divya-Marathi

ग्रीन करिअरसाठी उत्तम संधी : आपटे

पर्यावरण सत्र म्हणेज ग्रीन करिअरसाठी अनेक उत्तम संधी उपल्ब्ध आहेत. मात्र त्यासाठी नियोजनबद्ध व अभ्यासपूर्ण पावले टाकणे गरजेचे असल्याचे मत प्रख्यात पर्यावरण तज ‘विनिता आपटे (पुणे) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. किलॉस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त सोलापूर विद्यापीठ पर्यावरण संकुलातर्फे आयोजित व्याख्यानात आपटे बोलत होत्या. ‘ग्रीन इकॉनमी, ग्रीन जॉब, ग्रीन स्कील्स’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.  

प्रारंभी सोलापूर विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेद्र शेंडगे यांनी त्यांचे स्वागत केले, व्यासपीठावर किलॉस्कर फेरस इंडस्टरजने सरव्यवस्थापक एस. पी. वैदय, वसुंधरा महोत्सवाचे संचालक वरद चित्राव, सामाजिक शास्त्र विभागाचे संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार, पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. रवीद्र चिंचोलकर, डॉ. अनिल नारायणपेठकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘विनिता आपटे म्हणल्या, ‘यशस्वी होण्याचे गमक पैशात मोजले जाता कामा नये. चिनी भाषेत एक म्हण आहे की, निसर्ग व साधन संपत्ती यावर देशाची सुबता मोजले जाते. मला वाटते की पर्यावरण ही देशाची सुबत्ता मानली पाहिजे.  सध्या पर्यावरण विभागात काम काण्यासाठी अनेक संधी उपलबद्ध आहे. विध्यार्ध्यानी यात करिअर करण्यासाठी अभ्यासपूर्ण पावले टाकली पाहिजेत. ग्रामीण भागात स्वच्छ पाणी देणे, यातही मोठी संधी उपल्ब्ध होऊ शकते. कमीत कमी किमतीतील सोलर दिवे तयार करणे यातही मोठ्या संधी आहेत.

प्रश्‍न मंजुषा स्पर्धेत शिवदारे महाविद्यालयाची बाजी

सोलापूर विद्यापीठात आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेत शिवदारे महाविद्यालयाने बाजी मारली. संगमेश्वर महाविद्यालयाचा संघ द्वितीय, तर सोलापूर विद्यापीठ एमसीए विभागाचा संघ तृतीय आला. वसुंधरा चित्रपट महोत्सवानिमित्त सोलापूर विद्यापीठ पर्यावरण शाश्त्र विभागाने हि स्पर्धा आयोजिली होती.

त्या म्हणाल्या, कम्युनिकेशनमध्ये अनेक संधी असताना मला स्वतःला समाजसेवा करण्याची इच्छा असल्याने पर्यावरण रक्षणातील संधी हेरली. एकूणच समाजाला काही तरी देणे, पर्यावरण पूरक काम करणे यातही करिअरची संधी मिळू शकते. ग्रीन रिसर्च म्हणजे हिरवी जीवनशौलीमध्ये पर्यावरणपूरक किंवा या संबंधित असणाऱया क्षेत्रात संशोधन करणे. पर्यावरण रक्षणासाठी संशोधन करणे ही त्याची संकल्पना आहे. चंगळवाद करीत असताना पर्यावरणाला धका बसतो. छोट्या अंतरासाठी गाडीचा वापर करण्यापेक्षा सायकलचा वापर करणे ही हिरवी जीवनशैली आहे. माणून मानसिकता बदलणे यासाठी ग्रीन रिसर्च करणे गरजेचे आहे.’

Leave a Comment