Get In Touch

Wrasse climbing gourami amur pike Arctic char, steelhead sprat sea lamprey grunion. Walleye

Contacts
Location
523 Sylvan Ave, 5th Floor
Mountain View, CA 94041USA

Case Study Details

Indian-Achiver-Award-MT

डॉ. आपटे यांना इंडियन अचिव्हर अँवॉर्ड

इंडियन अचिव्हर्स फोरमतर्फे पर्यावरण व अपारंपरिक ऊर्जेचे संवर्धन या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तेर पॉलिसी सेंटरच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांना ‘इंडियन अचिव्हर अँवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. कॉर्पोरेट, खेळ, तंत्रज्ञान, विज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम, उद्योजकता, सामाजिक कार्य, कला, मनोरंजन; पर्यटन, आरोग्य सेवा, शिक्षण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्‍तींना इंडियन अचिव्हर्स फोरमतर्फे पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी ‘वूमन ऑफ एक्सलन्स’ विभागात देशपातळीवर डॉ. आपटे यांची निवड करण्यात आली. पर्यावरण व अपारंपरिक ऊर्जा संवर्धना संदर्भात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, त्यांना याविषयीचे प्रशिक्षण देणे यासाठी डॉ. विनिता आपटे या गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. पॅरिस परिषदेमध्ये, २०१५ साली त्या महिला व पर्यावरण, वनीकरण, रेड प्लस प्लस आदी विषयांवरील आयोजित परिसंवादात सहभागी झाल्या होत्या.

Leave a Comment