1 वर्षी इजिप्तमध्ये मॉन्ट्रियल करारासाठी १९८ देशांच्या प्रतिनिधींची बैठक भरली होती. त्या वेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिनिधींच्या मुलाखती घेतल्या आणि मीटिंगचं रिपोटिंगही केलं होतं. या कामामुळे न्यूयॉर्क, बाली येथे झालेल्या परिषदांसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. तसंच लहान मुलांमध्येही पर्यावरणविषयक जागृती व्हायला हवी, असं त्यांना वाटतं. त्यासाठी त्यांनी खास “एज्युकेशन पॅक” तयार केला आहे. या सगळ्या प्रवासात पर्यावरणाशी जोडून घेऊन काम करायला मिळाल्यानं आनंद वाटत असल्याचं त्या सांगतात.
“पर्यावरणासाठी काम करताना समाधान नक्कीच असतं; पण एकूण या क्षेत्रात होत असलेल्या कामाविषयी मात्र मी समाधानी नक्कीच नाही. होतं कसं, की जगभरातल्या प्रगत-अप्रगत राष्ट्रांत, अगदी कोपऱ्यातल्या छोट्या गावातही बेसुमार समस्या आहेत. त्यांना जगण्यासाठी अन्न मिळवण्याचीच भ्रांत असल्यामुळे असं पर्यावरणासाठीचं काम म्हणजे भरल्या पोटी रिकामे उद्योग वाटतात. त्यामुळे संपूर्ण समाजात ‘पर्यावरण वाचलं तरच आपण सगळे वाचणार’ हा विचार रुजवण्याची गरज आहे. सर्वसामान्यांमध्ये अशी जागरूकता हळूहळू वाढते आहे, पण पुष्कळदा नक्की कसे प्रयत्न करायचे याविषयी संभ्रम दिसून येतो. खरं तर या क्षेत्रात करियर करण्यासाठीही अनेक संधी आहेत. गरज आहे ती दृष्टिकोन बदलण्याची, नव्या नजरेतून या सगळ्याकडे बघण्याची. आपारंपरिक ऊर्जेच्या उपकरण दुरुस्ती आणि देखभाल तंत्रज्ञ म्हणून, त्याचप्रमाणे पर्यावरण हा विषय घेऊन पत्रकारिता, पर्यावरणावर म * संर यांमध्ये नोकरी, शाळा-महाविद्यालयात विशेष शिक्षण घेतलेल्या विषयांचे शिक्षक म्हणून… अशी संधींची किती तरी कवाडे उघडी आहेतच. पण तुमचं करियर जरी वेगळ्या क्षेत्रात असलं तरी या विशाल आणि समृद्ध अशा निसर्गाचा एक घटक म्हणून आपणही जमेल तसं त्यासाठी करायला हवं हे नक्की.
(मुलाखती : मंजिरी तिक्का)