‘राजकारणामध्ये नेते कमी ‘अभिनेतेच’ अधिक असतात. त्यांच्यात चेहरे शोधायला गेल्यास मुखवटेच अधिक सापडतील. मुखवटे मला आवडत नाहीत. त्यामुळे मी राजकारण्यांचे फोटो काढत नाही’, असे मत प्रसिद्ध सिनेछायाचित्रकार गोतम राजाध्यक्ष यांनी येथे व्यक्त केले.
आशय सांस्कृतिकच्या पुलोत्सवात राजाध्यक्ष यांची विनिता आपटे यांनी मुलाखत घेतली. त्यांनी घेतलेल्या छायाचित्रांच्या स्लाईडसच्या माध्यमातून त्या चेहर्यामागील व्यक्तिमत्त्वाची ओळख त्यांनी उपस्थितांना करून दिली. यावेळी आशा भोसले उपस्थित होत्या.
चंदेरी दुनियेतील सितार््यांपासून ते जे. आर. डी. टाटा यांच्यापर्यंतच्या अनेक क्षेत्रांतील व्यक्तींना कॅमेऱ्यात पकडलेल्या राजाध्यक्षांनी राजकारण्यांचे फोटो का काढले. नाहीत, या प्रश्नावर त्यांनी हे मतं व्यक्त केले. मात्र, पंडित नेहरू आणि रांधाकृष्णन यांचे फोटो काढायला आवडले असते, असे त्यांनी नमूद केले.
राजकारण्यांमध्ये खोटारडेपणा असतो. अशांसाठी माझ्याकडे वेळ नसतो, असे सांगून जी व्यक्ती कॅमेऱ्याचे अस्तित्व विसरू शकते ती उत्तम मॉडेल बनू शकते. मुलांना टीवीवर चमकवण्यासाठी पालकांची जास्त घाई असते, त्यामुळे बालपणावर अन्याय होतो, असे मतही त्यांनी एका प्रश्नावर व्यक्त केले. शोभना समर्थ, नूतन ते काजोल असा कॅमेर्याचा प्रवास उलगडून दाखवताना त्या चेहर्यामागील अनेक अपरिचित पेलू सांगत त्यांनी एक वेगळीच रंगत आणली.
त्यांच्या या प्रवासात त्यांना मराठी उखाणे घेण्यात एक्स्पट आसणारी नूतन भेटते, तसा चेहरा अजून झाला नाही, होणारही नाही, अशी प्रतिक्रिया ते व्यक्त करतात. आपल्याच विनोदावर मिष्किलपणे हास्यात रमलेल्या लता आणि आशा, कॅमेऱ्याला बुजणारा अमिताभ, अगदी सहजपणे अभिव्यक्त होणारी माधुरी, हिंदुस्थानी सौंदर्याची ब्रँड अँम्बॅसिडर असलेली ऐश्वर्या, खट्याळ पण, संवेदनशील काजोल, हार्डवर्कर शाहरूख असे अनेक चेहरे भेटतात. तसेच फ्रेंच व्हिस्कचो आवड असणारे जे. आर. डी. टाटा आणि बाहुल्यांचा छंद असलेले फिल्ड मार्शल माणकेंशॉ अशी जगावेगळी व्यक्तिमत्त्वे हा कॅमेरा घेऊन येतो.
स्वतःच्याच प्रेमात पडलेली रेखा आणिं कमल हसन जसे भेटतात. तसे भारावलेल्या छायाचित्रकारावरील दडपण कमी व्हावे म्हणून त्याच्या असिस्टंटशीच गप्पा मारणारा दिलीपकुमार भेटतो. हा कॅमेरा आठंवणीत रमतो आणि चंदेरी दुनियेचा प्रवासच घडवून आणतो, असा अनुभव आज प्रेक्षकांनी घेतला.