Get In Touch

Wrasse climbing gourami amur pike Arctic char, steelhead sprat sea lamprey grunion. Walleye

Contacts
Location
523 Sylvan Ave, 5th Floor
Mountain View, CA 94041USA

Case Study Details

Ozzy-2-1

कार्बन फ्लोरो कार्बनचे प्रमाण नियान्तीत नियंत्रित आणण्याचा प्रयत्न

‘ओझोनेच्या थाराला घातक ठरणाऱ्या कार्बनफर फ्लोरो कार्बनचे (सीएफसी) प्रमाण सन २०१० पर्यंत १०० टक्के नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताने गेल्या काही वर्षात सीएफसीवर ५० टक्के, तर कार्बन  प्लोराईटवर ८५ टक्के नियंत्रण आणले आहे, अशी माहिती भारत सरकारच्या वनसंरशन व पर्यावरण विभागाचे सरचिटणीस डॉ. बी, नीलरत्नयांनी आज दिली.

       महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या हस्ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणाच्या ओझोनकृती विभागातर्फे ओझोनची माहिती देणाऱ्या पुस्तक संचाचे प्रकाशन एस, एम, जोशी सभागृहात करण्यात आले. मराठी, उर्दू व बंगाली या भाषात ही पुस्तक आहेत.

या वेळी डॉ.नीलरत्न ओझोन थर आणि पर्यावरण या संदर्भात बोलत होते. युनायटेड नेशन रिजनल प्रोग्रामचे बँकॉकचे प्रतिनिधी अतुल बगाई, उपक्रमच्या समन्वयक विनिता आपटे या वेळी उपस्थीत होत्या.

   डॉ. बी. नीलरत्न म्हणाले, ओझोनथर मानवाला उपयोगी असून, हा थर राहण्यासाठी जगातील १९० देश गेली अनेक वर्ष प्रयत्नशील आहेत. याचाच भाग म्हणून भारत सरकारने ओझोन थराला घातक न ठरणाऱ्या उधोगाना सीमाशुल्क, अबकारी करात सवलत देण्याची तरतुत यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

    पर्यावरणाची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी २००५ ते २०१४ या कालावधीत विशेष प्रयत्न केले जात आहेत .शिक्षकच मुलांना पर्यावरणाचे शिक्षण साध्या आणि आकर्षक स्वरुपात देऊ शकतात.”

         ओझोनेचा थर हा पृथ्वीसाठी कवचकुंडले असून, त्याचे संवर्धन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे महापौर भोसले यांनी सांगितले. विनिता आपटे यांनी आभार मानले.

Leave a Comment