Get In Touch

Wrasse climbing gourami amur pike Arctic char, steelhead sprat sea lamprey grunion. Walleye

Contacts
Location
523 Sylvan Ave, 5th Floor
Mountain View, CA 94041USA

Case Study Details

cropped-Pune-12-Nov-2015

छोट्या छोट्या गोष्टीतून सृष्टी वाचविण्याचा प्रयत्न

काही वर्षापूर्वीबँकेचीस नोकरी सोडून मी सयुक्त राष्ट्र पर्यावरण संघाच्या ओझोन कृती विभागात काम करताना घेतलेला अनुभव भारतातील ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यासाठी मी तेर पोलिसी सेंटर या संस्थेची स्थापना केली. गेली चार वर्ष या  संस्थेच्या उपक्रमाद्वारे पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्न करीत आहे. ‘तर’ संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेच, त्याचबरोबर देशातही विविध पातळ्यावर संस्थेची कामे चालू आहेत. तेर हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ पृथ्वी.  Technology, Education, Research, Rehabilitation for the Environment अशा चार माध्यमातून  शाश्वतविकास करण्या साठी संस्था कटीबद्ध आहे.  युनेपचे माजी निदेशक राजेंद्र शेंडे यांचे मार्गदर्शन संस्थेला वेळोवेळी लाभते.

वाढत्या सिमेंटच्या जंगलात पर्यावरण समतोल साधण्यासाठी अर्बन फोरेस्त्री  ही संकल्पना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडली. पुण्यातील वारजे येथील टेकडीवर वनविभागाच्या मदतीने व टाटा मोटर्स, प्रसीसतंत या कंपन्याच्या सहभागातून चार हजारपेक्षा अधिक झाडे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.

कास पठार व पंचक्रोशीतील नागरिकांना शाश्वत जीवनशैलीसाठी विविध योजनाद्वारे सहकार्य केले जाते.  परिसरातील गावांमध्ये प्रय्रातानाला चालना देऊन व्हिलेज टूर सारख्या संकल्पना राबवीत आहे. सौरउर्जेसारख्या अपारंपरिक स्त्रोत्रांचा वापर वाढवियासाठी महाविध्यालयीन विद्यार्थामध्ये जागृती करूनकाही प्रकल्प राबवीत आहे. संस्थेतर्फे तरुणांना मार्गदर्शन केले जाते. नोकरीसाठी संस्थेत येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षित करून परदेशी जाण्याची संधीहि उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थासाठी पर्यावरण अभ्यास, प्रश्नमंजुषा, रोजच्या जीवनात पर्यावरण वाचविण्यासाठी छोट्या गोष्टी, परदेशातील जागरूकतेविषयीच्या ललित लेखनाचे पुस्तक असे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

 यावर्षी प्रथमच मराठी व इंग्रजी भाषामधून ग्रीन आलींपियाड स्पर्धा वन खाते व इनामदार कॉलेजच्या वतीने घेतली जाणार आहे. पर्यावरणविषयक अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून पाच ग्रामीण मुलांना प्रत्येकी एक लाखाची डा. अब्दुल कलाम फेलोशिप सुरुकेली आहे. या सर्व योजनाची माहिती www.terrepolicycentre.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

Leave a Comment